सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (२२ जुलै) : तालुक्यात आधारभूत भरडधान्य मका आणि ज्वारी खरेदी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. खरेदी सुरु करण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील यांना दि. ६ जुलै रोजी पत्र दिले होते.
आधारभूत पणन २०२०-२१ अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने भरडधान्य खरेदी करण्यासाठी ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. खरेदीची मुदत संपल्याने अद्यापही काही शेतकरी शिल्लक असल्याने यासाठी मुदतवाढ मिळावी याकरिता केलेल्या मागणीची दखल घेऊन ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदतवाढ मिळल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी आणि मका खरेदी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राज्यशासनाने जाहीर केल्याप्रमाणे मका आणि ज्वारी खरेदी सुरु होऊन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल. मुदतवाढ मिळल्यामुळे आमदार केराम यांच्या मागणीला यश आले आहेत.
भरडधान्य मका, ज्वारी खरेदीसाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 22, 2021
Rating:
