"पुण्य विकत मिळत नाही " दारू व्यसन मुक्तीचे कार्य कार्य करून पुण्य मिळते - अनिल डोंगरे



सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
चंद्रपूर, (२४ जुलै) : गुरू पौर्णिमा या शुभ दिनाचे औचित्य साधून तालुका पोभर्णा येथे मार्गदर्शन, सत्कार, भूमिपूजन व फलकाचे अनावरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अनिल डोंगरे जिल्हा अध्यक्ष प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर हे होते तर प्रमुख पाहुणे श्री.संजय बुटले प्रदेश सचिव प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना श्री.भाऊराव ठाकरे जिल्हा अध्यक्ष व्यसन मुक्ती संघटना गडचिरोली, श्री.भालचंद्र रोहनकर जिल्हा प्रचारक चंद्रपूर, श्री.नारायण खापने, श्री.सूरज गोरंटावार, श्री.धम्मा निमगडे, श्री.संतोष बुरांडे सर, श्री.संजय तारोडे, हे होते. कार्यक्रमाची सुरवात प.पूज्य शेषराव महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अभिवादन करून सुरुवात झाली.  या कार्यक्रमाअंतर्गत पोभुर्णा तालुका संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पोभुर्णा तालुक्यातील मागील ५ ते १० वर्षापासून दारू व्यसन मुक्त झालेल्या लोकांचे संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी अनिल डोंगरे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलतांना   दारूच्या आहारी गेलेला समाज या संघटनेच्या माध्यमातून तसेच प.पूज्य शेषराव महाराज यांचे शक्तीने व त्यांचे उतराधिकारी प.पूज्य संतोष महाराज यांचा संकल्प व प्रवचनातून समाज 'दारू व्यसन मुक्त' करणे हाच आहे. प.पूज्य संतोष महाराज यांचे दारू व्यसन मुक्तीचे कार्य देशासह महाराष्ट्रात जोमात असून, महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा या कार्यात पहिला क्रमांक आहे. हे कार्य असेच सुरू ठेवायचे असून, हे कार्य केल्याने पाप लागत नसून पुण्य मिळते आणि पुण्य हे बाजारात पैसे देऊन विकत मिळत नसून त्यासाठी दारू व्यसन मुक्ती सारखे कार्य करावे लागते असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या शेवटी देवाडा येथील प.पूज्य शेषराव महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामाचे, जागेचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोभूर्णा तालुक्यातील पोभूर्णा, जूनगाव, देवाडा, दिघोरी, नवेगाव मोरे, लाल हेटी, देवाडा खुर्द, चेक फुटाणा इत्यादी गावातील जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प.पूज्य. शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना तालुका पोभूर्णां च्या वतीने श्री.मारोती वाकुळकर तालुका अध्यक्ष, ता. पोभूर्णां श्री.साईनाथ कुणघाटकर, तालुका उपाध्यक्ष श्री.विजय वाडेकर, तालुका सचिव श्री.अशोक, श्री.नामदेव राउत, श्री.कपिल बरांडे, श्री.संजय, श्री प्रदीप थोरात, श्री. स्वपनील धुमने, श्री.राजू लडके, श्री.प्रमोद गुरणुले, श्री.सुभाष पेंदोर.श्री.प्रकाश पाल, श्री. अनंता दिवसे.श्री. दशरथ दीवसे, श्री.मनोज भोयर, श्री.लक्ष्मण नवगढे, सतीश लोणारे विशेष परिश्रम घेतले.
"पुण्य विकत मिळत नाही " दारू व्यसन मुक्तीचे कार्य कार्य करून पुण्य मिळते - अनिल डोंगरे "पुण्य विकत मिळत नाही " दारू व्यसन मुक्तीचे कार्य कार्य करून पुण्य मिळते - अनिल डोंगरे Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.