सौ. संध्या गुरनुले जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली मूल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (२४ जुलै) : आज मुल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा व तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी (ग्रामीण) सौ. संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे पार पडली. 
             
येणाऱ्या ३० जुलै ला आपले लाडके माजी पालकमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजन करिता बैठक घेण्यात आली. 
           
यावेळी उपस्थित श्री. चंदू मारगोनवार सभापती पंचायत समिती मूल, सौ. वर्षा लोनबले सदस्या पंचायत समिती, श्री. नंदू रणदिवे उपनगराध्यक्ष नगर परिषद मूल, श्री. प्रभाकर भोयर शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मूल, श्री. प्रशांत समर्थ नगरसेवक, श्री. अजय गोगुलवार, श्री. चंदू आष्टनकर, श्री. बंडू नर्मलवर सरपंच उश्राला, श्री. संजय येनूरकर, श्री. अमोल चुदरी, श्री. राजू पोटे, श्री. प्रशांत बोबाटे व कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. संध्या गुरनुले जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली मूल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सौ. संध्या गुरनुले जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली मूल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक  Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.