सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (२४ जुलै) : नगर परिषद राजुरा च्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लक्ष रूपये निधी मंजूर करून येथे स्वर्ग रथ उपलब्ध केला. या स्वर्ग रथाचे लोकार्पण नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वर्ग रथाचे चालक सिडाम यांच्याकडे चाबी सुपूर्द करून केले.
राजुरा शहराच्या विकासासाठी आपण कट्टीबद्ध असून, शहर विकासासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्याने पाठपुरावा करीत आलो आहे. शहरातील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी स्वर्ग रथाची आवश्यकता होती. येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने पूर्वी गडचांदूर, बल्लारपूर वरून स्वर्ग रथ आणावे लागत असे. नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी येथे स्वर्ग रथ उपलब्ध करून दिला. यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय आता दूर होईल अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वर्ग रथाचे लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली आहे.
या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य अजय बतकमवार, अरविंद लांडे, नगर परिषद कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रसिद्धी प्रमुख राजुरा विधानसभा काँग्रेस यांनी माहिती दिली.
नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते स्वर्ग रथाचे लोकार्पण.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 24, 2021
Rating:
