आंतरराष्ट्रीय परिषदेत श्री. शशांक नामेवार यांना बेस्ट एम्पलाय ऑफ दि इयर अवॉर्ड ( Best employee of the year award 2021) जाहीर


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
कोरपना , (२४ जुलै) : नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड (Govt.of UK)आणि चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूरचे मुख्य लिपिक श्री. शशांक शंकरराव नामेवार यांना आंतरराष्ट्रीय बेस्ट एम्प्लाय ऑफ दि इयर हा पुरस्कार जाहीर झाला असून प्रमाणपत्र,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंग्लंड व भारतातील सदस्य असलेल्या गठीत समितीद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजकांकडून विविध आतंरराष्ट्रीय पुरस्‍कारासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले होते.यामध्ये देशभरातून १०९ प्रस्ताव आलेले होते. त्यापैकी २८ पात्र प्रस्तावाची निवड करण्यात आलेली होती. परिषदेमध्ये पात्र प्रस्तावांना विविध गटात पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. श्री. शशांक नामेवार हे महाविद्यालयात मुख्य लिपिक असून त्यांचे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यात, विविध उपक्रमात, तसेच राष्ट्रीय सेवा योजना, प्रौढ शिक्षण, गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तथा माजी विध्यार्थी, पालक समिती या सर्व समित्यांचे सदस्य असून, त्यांनी १०० चे वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांनी प्रशासकीय गुणवत्ता सुधार अंतर्गत अनेक उद्बोधन व उजळणी वर्ग पूर्ण केले आहे. त्यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर हा आतंरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेत श्री. शशांक नामेवार यांना बेस्ट एम्पलाय ऑफ दि इयर अवॉर्ड ( Best employee of the year award 2021) जाहीर आंतरराष्ट्रीय परिषदेत श्री. शशांक नामेवार यांना बेस्ट एम्पलाय ऑफ दि इयर अवॉर्ड ( Best employee of the year award 2021) जाहीर Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.