मौजा गोकुंदा-घोटी जिल्हा परिषद किनवटकडे जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
किनवट, (२४ जुलै) : मौजे गोकुंदा घोटी जिल्हा परिषद गट मधील ठाकरे चौक पासून ते दत्तनगर-हबीब कॉलनी ते किनवटकडे जाणारा जिल्हा परिषद गोकुंदा /पंचायत समिती गण मधील रस्ता नागरीकांच्या रहदारीमध्ये आणतोय अडथळा, या मार्गाने जागो जागी खड्डे पडून पावसाचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर रस्ता चिखलमय झालेला आहे. तरी प्रशासनाला जाग कां येत असा प्रश्न कुलसंगे यांनी उपस्थित केला आहे.

हबीब कॉलनी, दत्तनगर, पेटकुले नगर, बिरसा चौक, येथील स्थानिकांना हा रहदारीचा रस्ता असून, येण्या जाण्यास फारच तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. साधारण समस्या हे सोडवू शकत नसतील तर अन्य काय काम करतील असा टोला ही लागवला आहे.

संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत गोकुंदा गण, व PWD विभाग यांनी सदर रस्ता १४ ऑगस्ट २०२१ पर्यत दुरुस्त करावा. अन्यथा त्यांचे  विरोधात तीव्र आदोलन सुरु करावे लागेल, असे 
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी सेवक जितेंन्द्र कुलसंगे यांनी या ठिकाणी झाडे लाऊन निषेध व्यक्त केला आहे.

मौजा गोकुंदा-घोटी जिल्हा परिषद किनवटकडे जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था मौजा गोकुंदा-घोटी जिल्हा परिषद किनवटकडे जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.