मारेगाव, (२४ जुलै) : तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे धारदार शस्त्राने एका इसमावर हल्ला करून जखमी केल्याची घटना (दि.२३) जुलै ला सायंकाळी ८:४५ च्या दरम्यान घडली. धारदार शस्त्र हल्ल्यात जखमी झालेले सोनबा कोरझरे (४५) रा. बोरी (गदाजी) पोड, असे त्यांचे नाव असून हल्लेखोर विशाल पंजाब उईके (२७) रा. बोरी (गदाजी) असे आरोपीचे नाव आहे. तो फरार झाल्याची माहिती आहे.
असा घडला थरार...
घटनेच्या दिवशी सोनबा कोरझरे (४५) व त्याचा मुलगा अंकुश सोनबा कोरझरे (२२) व मंगल सोनबा कोरझरे (१५) हे प्रभाकर नावाच्या इसमाला दापोरा येथे सोडून गावी परतल्यानंतर गावातील पान टपरीवर खर्रा घेऊन घराकडे जात असतांना अगदी गदाजी महाराज देवस्थानाच्या प्रवेशद्वार समोर आरोपीचा भाऊ मंगेश आणि जखमी सोनबा बोलत होते, तेवढ्यातच आरोपी विशाल हा मागून आला आणि हातातील तीक्ष्ण चाकूने एकदम वार केला. पोटावर सोनबाच्या चाकू भोकसल्याने रक्त बंबाळ झाला, आरडा ओरड सुरु झाल्याचे पाहून आरोपी विशाल उईके हा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी वडीला ला काही वेळातच ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले मात्र, वैद्यकीय तपासणी अंती,प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला यवतमाळ येथे रवाना करण्यात आले.
दरम्यान,आरोपी विशाल पंजाब उईके याचेवर फिर्यादी जखमीमीचा मुलगा अंकुश कोरझरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली, पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.
४५ वर्षीय इसमावर चाकूने हल्ला: आरोपीस अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 24, 2021
Rating:
