सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२७ जुलै) : तालुक्यातील मागील काही दिवसांत अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे केलेली आहे.
कोरपना तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व सोयाबीनच्या पिकाला प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, शेतकरी वर्ग फार मोठ्या संकटात असून त्यांना सदर बाबींचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईची अत्यंत आवश्यकता असून शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामळे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे सदर शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे होऊन आर्थिक मदत मिळावी याकरिता निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
आपण सदर प्रकरणाबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन याबाबत आवश्यक कार्यवाही करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी माहिती यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी दिली.
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2021
Rating:
