सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (२७ जुलै) : नांदेड जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील किनवट आणि माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या आस्थापने मधील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेला होत असलेल्या समुपदेशन पद्धतीने बदलीने भरणाऱ्या जगात किनवट माहूर तालुक्यातील रिक्त पदांचा अनुशेष पूर्ण करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे (ता.२६) रोजी एका तातडीच्या पत्राद्वारे केली आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी पदोन्नती कर्मचाऱ्यांची भरताना केवळ किनवट माहूर तालुका वगळून पदस्थापना देऊन येथील रिक्त पदांचा अनुशेष कायम ठेऊन आदिवासी भागावर एक प्रकारे अन्याय केला जात आहे. शासनाच्या निकषानुसार आगामी होत असलेल्या समुपदेशन बदली प्रक्रियेत माहूर किनवट तालुक्यातील १०० टक्के रिक्त जागा प्राधान्याने भरल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून या भागात यापुढे रिक्त पदे राहणार नाहीत. व तसेच माहुर किनवट या आदिवासी उपयोजना क्षेत्र भागांमध्ये बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी पदस्थापना किंवा प्रतिनियुक्ती देण्यात येणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अन्यथा याप्रकरणी राज्य शासनाला पुराव्यानिशी अवगत करून संबंधितांविरुद्ध कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार भीमराव केराम म्हणाले असून माहूर किनवट चा अनुशेष कायम करून कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात सुजलाम-सुफलाम होताच येणार नसल्याचा सज्जड इशारा केराम यांनी यानिमित्ताने दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून माहूर आणि किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असता पण यामध्ये पदस्थापना मिळालेले कर्मचारी वशिलेबाजी करून जिल्ह्यात नांदेड शहर जवळ पडेल अशा ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळवितात. पेसा अंतर्गत क्षेत्रातून प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त किंवा तत्सम दर्जाच्या सनदी अधिकाऱ्यांना असताना मात्र जिल्हा परिषद मधून कागदी घोडे नाचवून सहज प्रतिनियुक्तीचा फार्स पूर्ण केला जातो. हे प्रकार आता माहूर किनवट तालुक्याचे बाबतीत खपून घेणार नसल्याचे सांगत जिल्हा परिषद मध्ये आगामी होत असलेल्या पदोन्नतीतील सम प्रदेशाने होत असलेल्या बदली प्रक्रियेत माहूर आणि किनवट चा अनुशेष अग्रक्रमाने भरण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना केली आहे. त्यामुळे माहुर किनवट ला पदस्थापना घेऊन प्रतिनियुक्ती चे स्वप्न रंगवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न भंगणार हे मात्र खरे.
समुपदेशन बदली प्रक्रियेतून किनवट माहूर चा अनुशेष पूर्ण करा....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2021
Rating:
