पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (१० जुलै) : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्य तेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची भावही गगनाला भिडले आहेत.

महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. या महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले असून, असाह्य झाले आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात आज बीड शहरांमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा, बस स्टॅन्ड, अण्णाभाऊ साठे पुतळा, सुभाष रोड, भाजी मंडई, बशीर गंज मार्गे रॅली काढण्यात आली.

यावेळी शहरातील प्रमुख चौकाचौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शहरातील सर्व परिसर, 'वारे मोदी तेरा खेल ससती दारु मैहेंगा तेल' या घोषणांनी शहर दणाणून गेला. या घोषणेमुळे बीड शहरातील सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यास जनतेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला.
या आंदोलनामध्ये बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, जिल्हा प्रभारी सत्संग जी मुंडे, एड. कृष्णा पंडित, तालुका अध्यक्ष महादेव धांडे, जिल्हा सरचिटणीस एड. राहुल साळवे, शहराध्यक्ष डॉ. इद्रीस हशमी, सेवादल जि. अध्यक्ष योगेश शिंदे, वच्छिष्ट बडे, अरुण कांबळे, राणा चव्हाण, गोविंद साठे, जयप्रकाश आघाव, गणेश राऊत, परवेज कुरेशी, चरण सिंग ठाकूर, नितीन वाघमारे, संतोष निकाळजे, गणेश कारंडे, कमर इमानदार, शबदर, देशमुख अविनाश दरपे, प्रितेश दायमा, राहुल लोळगे, अशोक बहिरवाल, ऋषभ कोठारी, राहुल टेकाळे, महेश मस्के तुषार मस्के सह सर्व कॉंग्रेस पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. 
पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.