सह्याद्री न्यूज | सोनवणे
बीड, (२४ जुलै) : कामगार वर्ग विविध शासकीय योजने पासुन कायम वंचित राहिला असुन शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना गरजु कामगारांपर्यंत पोहचविणे हे आपले आद्यकर्तव्य असुन, कामगारांच्या हितासाठी भिम स्वराज्य कामगार संघटना कार्यरत असुन, हेच संघटनेचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक एड. विकासजी जोगदंड यांनी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कामगार सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित कामगारांना संबोधित करतानां केले
कार्यक्रमास मानवहीत लोकशाही पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रणजित जोगदंड, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिम स्वराज्य कामगार संघटनेचे जिल्हा समन्वयक मंगेश जोगदंड यांनी केले. याप्रसंगी महादेव वंजारे पठाण, अप्पा चक्रे, सचिन जाधव, गोविंद वाघमारे, नवनाथ गोरे, आकाश गायकवाड, आदर्श जोगदंड, आदित्य जोगदंड सह कामगार महिला भगिनी व बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या हितासाठी कार्यरत राहणे हेच संघटनेचे एकमेव ध्येय - नगरसेवक एड. विकासजी जोगदंड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 25, 2021
Rating:
