सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२५ जुलै) : महागांव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर, माजी जि. प. सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील हिवरेकर, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दौलतराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, पुसद प्रा.शिवाजी राठोड, माजी जि. प. सदस्य तथा पुष्पावती साखर कारखानाचे माजी चेअरमन पंंजाबराव खडकेकर, पं स. माजी सदस्य तथा राष्ट्रवादी चे युवा उपाध्यक्ष संदीप पाटील ठाकरे, पं. स.सभापती अनिताताई चव्हाण, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महागांव प्रा.सिताराम पाटील ठाकरे, महागांव शहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे विजय सुर्यवंशी, पं. स. माजी उपसभापती विजय महाजन हे उपस्थित होते.
राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या आदेशावरून येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणूका व तालुक्यात पक्ष वाढीस करण्याकरिता ही आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर यांच्या नेतृत्वात पार पडली. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील हिवरेकर यांनी महागांव तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष बळकटी करण करण्यासह समाज सेवेला महत्व द्या असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी तालुक्यातील सर्व आजी माजी, पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सर्कल वाईज बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महागांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 25, 2021
Rating:
