अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वणी शाखेचा जिल्हा दौरा व आढावा बैठक संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (२५ जुलै) : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा जिल्हा यवतमाळ चा जिल्हा दौरा या कार्यक्रमचा आज वणी येथे दौरा वसंत जिनिंग हॉल येथे संपन्न झाला. या दौरा ला जिल्हा अध्यक्ष श्री.मा नरेश भाऊ गेडाम तालुका वणी शाखेचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात अ.भा.आ.वि.प. शाखा वणी ला संजीवनी कशाप्रकारे येईल या गोष्टीचे मौलवान मार्गदर्शन केले. प्रमुख पाहूणे म्हणून विर्दभ सचिव श्री.उत्तम गेडाम यांनी सुद्धा मार्गदर्शन लाभले. जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र चांदेकर सर, जिल्हा महासचिव तुषार आत्राम, जिल्हा सचिव सुरेश किनाके, जिल्हा संघटक निळकंठ तोडसाम, जिल्हा कार्यध्यक्ष सुभाष गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष शत्रुघन मडावी यांचे ही मार्गदर्शनासह प्रोत्साहन केले. या वेळी  वणी शाखेतील श्री.नंदकुमार बोधकर (माजी नायब तहसिलदार) यांची यवतमाळ जिल्हा कमिटी च्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे अ.भा.आ.व.प. तालुका शाखा वणी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत अ. भा. आ. वि. परिषद तालुका वणीचे अध्यक्ष अशोक नागभिडकर यांनी व्यक्त केले.

 यावेळी वणी शाखे च्या सर्व पदाधिकाऱ्यांत एक मताचा सुरु गुंजला आहे. शरद बेसकर, भालचंद्र तोडकर, उईके काका आडे, आशिष मडावी, अजय तोडकर, सुरज तोडकर, सौ. सुर्वणा किनाके, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव शंकर किनाके यांनी केले तर आभार प्रर्दशन तालुक अध्यक्ष वणी यांनी केले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वणी शाखेचा जिल्हा दौरा व आढावा बैठक संपन्न अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वणी शाखेचा जिल्हा दौरा व आढावा बैठक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on July 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.