पुसद : भर रस्त्यात युवकाची गोळया झाळून हत्या


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (२५ जुलै) : नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार वाशीम रोड पुसद येथील एका युवकांवर गोळ्या झाडल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्राच्या माहिती नुसार, वाशीम रोड, जमजम हॉटेल च्या समोरील भर रस्त्यात इम्तियाज अली (अंदाजे वय २५) वसंत नगर येथील युवकांवर अज्ञात दोन इसमानी मोटर सायकल वरून युवकावर गोळ्या झाडून हत्या केली. युवकाच्या डोक्याला गोळ्या लागल्या असून तो ठार झाला अशी माहिती प्रथमदर्शी समोर आली.

अज्ञात माथेफिरू कडून गोळ्या झाडल्या नंतर जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.
 वसंतनगर पोलीस कार्यक्षेत्रात ही घटना घडल्याने सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास वसंत नगर पोलीस करीत आहे. 
पुसद : भर रस्त्यात युवकाची गोळया झाळून हत्या  पुसद : भर रस्त्यात युवकाची गोळया झाळून हत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on July 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.