राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथे रक्तदान शिबीर संपन्न

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
धारूर, (ता.२७) : येथे छञपती राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले असून या निमीत्त आयोजित रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळला. या  शिबीरात ११ रक्तदात्यानी स्वंयस्फूर्तीने रक्तदान केले.

धारूर येथे छञपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे वतीने विवीध विवीध सामाजीक उपक्रम राबवून हि जयंती साजरी करण्यात आली. राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने जागतिक रक्तदान दिनाचे औचीत्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अर्जूनराव गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस आय चे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर चव्हान, पञकार अनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, नगरसेवक बालाजी चव्हान, सामाजिक कार्यकर्ते अमरजीत तिवारी, जयंती चे संस्थापक अध्यक्ष बंडोबा सांवत, उत्सव समिती अध्यक्ष शरद सांवत, विजय लोखंडे आदिंच्या  उपस्थितीत करण्यात आले. या रक्तदान शिबीराला  कोरोना संकटाचे सावट असतांना देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळला. यावेळी ११ रक्तदात्यानी रक्तदान केले असून अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीला रक्तदान करण्यात आले.

यावेळी रक्तपेढीचे डॉ.प्रियंकी गवई, शशीकांत पारखे, जगदीश रामदासी, शेख बाबा, बालाजी पडगी यांनी शिबीराला विशेष सहकार्य केले. तर या शिबीराच्या  यशस्वीतेसाठी शरद सांवत, बलभीम मुंडे, मदन नाटकर अजित शिनगारे, विजय सांवत बबलू सांवत, तानाजी मोरे आदीनी परीश्रम घेतले.
राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथे रक्तदान शिबीर संपन्न राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथे रक्तदान शिबीर संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.