सिंचन प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल जलसंपदामंत्री पाटील व पालकमंत्री चव्हाण यांचे आ. केराम यांनी मानले आभार
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (ता.२७) : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या किनवट, मारेगाव व धनोडा येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पास तत्वतः मंजूरी देवून मान्यता दिल्याबद्दल आमदार भीमराव केराम यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आ.भीमराव केराम यांनी आभार मानून नागझरी प्रकल्पाची उंची वाढविणे, रखडलेला उनकेश्वर येथील प्रकल्प पूर्ण करा वा व लघुसिंचन तलावाच्या कालव्यांची दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली.
नांदेड येथील नियोजन भवनात शनिवार (दि.26) रोजी झालेल्या बैठकीत किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन नागझरी मध्यम प्रकल्प सांडणव्यायाची उंची वाढविणे,उनकेश्वर उच्च पातळी बंधारा प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यतेस विशेष बाब अंतर्गत मंजुरी मिळवून देणे,लघु प्रकल्पा कालवा दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देणे आदी महत्वपूर्ण मागण्या केल्या.
याबाबत सविस्तर असे की, किनवट तालुक्यातील नागझरी मध्यम प्रकल्पाचे काम सन १९८६ ला पुर्ण झाले असून या प्रकल्पाची साठवण क्षमता ६.०० द.ल.घ.मी. आहे. सदरिल प्रकल्पात किनवट शहरास पिण्याच्या पाणीसाठी १.०० द.ल.घ.मी. आरक्षित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामास पाणी मिळत नाही. सदरिल प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पुर्ण संचयपातळी पेक्षा जास्त भुसंपादन केलेले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यायाची उंची ०.६० मी. ने वाढविल्यास अतिरिक्त भुसंपादन करण्याची गरज नाही. पाणीसाठा वाढुन शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम घेणे शक्य होईल. तेव्हा नागझरी प्रकल्पाच्या सांडव्याची उंची ०.६० मी. ने वाढवून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील दुसरी मागणी अशी की, उनकेश्वर येथे उच्च पातळी बंधाऱ्याचे कामास मंजुरी प्राप्त झाली असून, या प्रकल्पाचा पाणी वापर ९ .६९ द.ल.घमी. असून या प्रकल्पावर आतापर्यंत ५५.०० कोटी खर्च झालेला आहे. या प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता मापदंडात बसत नसल्यामुळे प्रलंबीत आहे. परंतु या प्रकल्पावर ५५.०० कोटी खर्च झाल्यामुळे व पुर्ण झाल्यास सिंचनामुळे या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा विकास होईल. त्यामुळे या प्रकल्पास विशेष बाब म्हणून सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब त्यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली.
तिसरी मागणी ही की, किनवट-माहूर मतदार संघातील पुढील लघुसिंचन तलावाच्या कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे :
१)पिंपळगाव लघुसिंचन तलाव-या तालावाचे कालव्या वरील बांधकामे ४० वर्षे जुनी असून पुर्णपणे पडलेली आहेत. दुरुस्तीशिवाय सिंचन करणे अशक्य झाले आहे. तरी त्वरीत निधी उपलब्ध करुन बांधकामे पुर्ववत करण्यास्तव आदेशित करावे.
२) पालाईगुडा बृहत ल.पा.तलाव - या तलावाच्या लाभक्षेत्रात भाग -१ (चाऱ्याचे काम) झाले नसल्यामुळे फक्त कालव्यालगतच्या शेतांना पाणी मिळत आहे व उर्वरित शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तरी त्वरीत चाऱ्याचे काम करण्यास्तव आदेशित करण्यात यावे.
३) मांडवी बृहत ल.पा.तलाव - या प्रकल्पाचे कालवे खडकाळ भागातून जात असल्याने पाण्याचा पाझर घेऊन शेवटच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही . तरी कालव्यास आवश्यक असलेले अस्तरीकरण करण्याचे आदेशित करावे. या मागण्या पूर्ण करून माझ्या आदिवासी डोंगरी मतदार संघाला बारमाही हिरे राहण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
सिंचन प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल जलसंपदामंत्री पाटील व पालकमंत्री चव्हाण यांचे आ. केराम यांनी मानले आभार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2021
Rating:
