टॉप बातम्या

आज दुपारी आलेल्या पाऊसाने तालुक्यात समाधान

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२७) : राळेगाव तालुक्यात आज दु.४ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली. बळीराजाला चांगल्या दमदार पाऊसाची अपेक्षा होती. ती आज आलेल्या टपोऱ्या थेंबाच्या या पावसाने त्याला पूर्णत्व मिळाले. या आधी एकाच दिवशी सव्वीस मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली होती. नंतर पेरणीच्या कामाला गती आली. 

आज दुपारी अचानक आभाळ भरून आले व पावसाला सुरुवात झाली. कपाशी, तूर, सोयाबीन करीता या पावसाची गरज होती. सध्या जमिनीतील बियाणे अंकुरणे सुरु असून, त्यावर पावसाच्या सिडकाव्याची नितांत गरज होतीच. आज झालेल्या पावसाने आता शेती कामाला गती येणार असून, तालुक्यात आलेल्या पावसाने समाधान व्यक्त  होत आहे. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();