सिडको एन सहा मथुरानगर भागात ड्रेनेजलाईनचे पाणी रस्त्यावर, सगळीकडे घाणीचे साम्राज्य


सह्याद्री न्यूज | संतोष गढवे 
औरंगाबाद, (ता.२७) : वर्षभरापासुन सिडको एन सहा मथुरानगर कुलस्वामीनी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुस घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासुन कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण देशात थैमाण घातलेले असतांना प्रत्येक व्यक्ति हा आपल्या आरोग्यांची विशेष काळजी घेतांना दिसतोय अशी परिस्थिती असतांना महानगरपालीकेच्या दुर्लक्षामुळे सिडको एन सहा मथुरानगर भागातील रस्त्यावर तसेच घरासमोरून नाल्याचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने परिसरात डास, मच्छर, विविध प्रकारचे किटके वाढल्याने साथीच्या रोगाची नागरीकांना तसेच लहान बालकांना महीलांना लागन झाली आहे. संपूर्ण गल्लीमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी साचल्याने नागरीकांना ये जा करतांना मोठी कसरत करावी लागते. ड्रेनेजलाईनचे पाणी खुप मोठ्या प्रमाणावर वाहत असुन हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या आत जाऊन अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. परिणामी फिल्टरचे विकतचे पाणी घ्यावे लागते त्यामुळे आर्थीक भूर्दड सुद्धा लागतोय. ही परिस्थिती मनपा वार्ड अधिकारी यांना कळवली असता, त्याच्यामार्फत तात्पुरत्या स्वयमरूपाचे काम केले जाते. त्यातही स्थानिक नागरीकांकडून पैसे घेतले जातात. काम झाल्याच्या एक तासानंतर परिस्थिती जेसे थे बघायला मिळते. मथुरानगरमधील हा भाग उताराच्या दिशेने असल्याने संपूर्ण वार्डाचे पाणी उताराच्या दिशेने जाऊन सरळ घरामध्ये शिरते. सद्या  पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचे लोढे मोठ्या प्रमाणावर वाहतात,भविष्यात या भागामध्ये दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जवाबदार मनपा प्रशासन असेल. पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागामध्ये नवीन ड्रेनेजलाईन टाकुन अतिरिक्त नविन चेंबर बाधावे व पाण्याचा निचरा चेंबरमध्ये करावा. तसेच सगळा परिसर स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी या भागात करावी व होणा-या त्रासापासून नागरीकांना मुक्त करावे अशी मागणी मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी तर्फे महानगरपालीकेला करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा, इशारा मनीष नरवडे यांनी दिला आहे.
सिडको एन सहा मथुरानगर भागात ड्रेनेजलाईनचे पाणी रस्त्यावर, सगळीकडे घाणीचे साम्राज्य सिडको एन सहा मथुरानगर भागात ड्रेनेजलाईनचे पाणी रस्त्यावर, सगळीकडे घाणीचे साम्राज्य Reviewed by सह्याद्री चौफेर on June 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.