सालेभट्टी येथील विविध निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी : लोकप्रतिनिधी यांना निवेदनातून केली ग्रामवासियांनी मागणी
सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.२७) : तालुक्यातील सालेभट्टी, वरुड -गट ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या मौजा सालेभट्टी येथील जन विकासाच्या विविध योजनेतील निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार यांना २०२०-२०२१ या सालीचे मंजूर झालेले ठक्कर बाप्पा योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात येऊ नये, या मागणी चे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले.
सदर निवेदनात सन २०१६-२०१७ ते २०२१ या कालावधीत शासनाच्या विविध योजनेतील साल्लेभटी येथे निकृष्ट दर्जाचे कामे करून लाखोचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पारदर्शक चौकशी करून संबंधित ठेकेदार व सचिव यांच्या कारवाई करण्यात यावी. तसेच गावात सन २०१६ -२०१७ ते सन २०२०-२१ या कालावधीत शासनाच्या विविध विकास योजनेतील सिमेंट,काँक्रेट रस्ते, बंदिस्त नाल्या, बांधकाम, व्यक्तिगत शौचालय, सार्वजनिक शौचालय, बांधकाम यासह विविध विकास कामे केल्या गेली. मात्र, सदरची विकास कामे आज रोजी अस्तित्वात आहे की, नाही हा प्रश्न साल्लेभटी येथील नागरिकांना पडलेला असुन, या निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून गावातील लोकांना नाहक त्रास दिल्या जात आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून नालीच्या बांधकामातील निकृष्ट दर्जा दुर्गंधीला आमंत्रण देत असून, परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले. याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असुन, तात्काळ बांधकाम थांबवून संबंधित ठेकेदार व ग्रामपंचायत सचिव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
वेळी उपस्थित गंगधार लोनसावले महाराज, बालाजी टेकाम, शंकर बोन्द्रे, नानाजी येरणे, डोंडू कोरझारे, गणेश लोनसावले यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होती.
सालेभट्टी येथील विविध निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी : लोकप्रतिनिधी यांना निवेदनातून केली ग्रामवासियांनी मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2021
Rating:
