सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (ता.२७) : तालुक्यातील मार्डी विद्युत सबस्टेशन असणाऱ्या गावाचा विद्युत पुरवठा दर पाच मिनिटाला जाणे येणं करीत आहे. काल झालेल्या पावसामुळे पुरवठा खंडीत झला असून गेल्या १२ तासापासून विद्युत पुरवठा सुरळीत नाही, सध्या वातावरणात उकाडा असल्याने घरात राहणे कठीण आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षण व शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे शेतमालाला पूरक पाणी सुद्धा देता येत नाही.
तालुक्यात पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना अखंड विद्युत आणि पाणी प्रश्न फार हवालदिल करणारा आहे. सध्या कोरोना या महामारीचे दिवस असल्यामुळे बरेच विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षण घेत आहे. मात्र, या मार्डी परिसरातील विद्युत पुरवठा सतत खंडीत होत असल्याने मोबाईल फोन चार्जिंग करायचे कसे व ऑनलाईन शिक्षण कसं घ्यावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी व्यक्त केले.
मार्डी विद्युत सबस्टेशन असणाऱ्या १५ गावाचा विद्युत पुरवठा जवळपास बंद आहे. ही गोष्ट नवी नाही या अगोदर याच संदर्भात आसुटकर यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर तो विजेचा लपंडाव काहीसा कमी झाला. परंतु आता थोडसं वातावरण बिघडलं किंवा पाणी पाऊस आला की बत्ती गुल होते. धड पाच मिनिट सुद्धा लाईट टिकत नाहीत.
यामुळे शेतकरी,विद्यार्थी आणि विद्युत वर अवलंबून असणारे व्यावसायिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. किंबहुना आर्थिक फटकाही बसत आहे. जर ही समस्या अशीच कायम राहली तर विद्युत अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठ्पुरावा करून तक्रार करु असे, त्यांनी सांगितले.
मार्डी परिसरातील विद्युत पुरवठा सतत 'ऑफ'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2021
Rating:
