सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२७) : वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा कुलरला करंट लागुन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २७ जुन रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहेत.
सौरभ रंजित भोसले (६) रा.पारधी बेडा दहेगांव ता.राळेगांव असे त्या चिमुकल्याचे नाव असून,घटनेच्या वेळी आई वडील व बहिण हे सर्व जण शेतात कामाला गेले होते. दरम्यान, तो घरी एकटाच असल्याने सकाळी नऊ वाजता दरम्यान जेवन आटोपल्यानंतर कुलरच्या बाजुला असलेल्या स्टिलच्या गुंडातून पाणी घेत असताना कुलरचा जोराचा करंट लागला. दरम्यान,या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्याला तातडीने उमरी येथील रुग्णालयात भर्ती केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असुन, दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील कोदुर्ली श्रीरामपूर येथे अशीच घटना घडली होती.त्या घटनेत दोन लहान चिमुकल्यांचा जीव गेला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
कुलरचा शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दहेगाव येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 27, 2021
Rating:
