टॉप बातम्या

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी शुक्ला कुटुंबियांचे केले सांत्वन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (ता.४) : पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज बाजीप्रभू नगर येथे मयंक शुक्ला यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली. दिवंगत मयंक शुक्ला चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. यावेळी जुल्फेश शहा, उद्योग विभागाचे गजेंद्र भारती उपस्थित होते.

नुकतेच त्यांचे कोरोनापश्चात झालेल्या आजाराने निधन झाले. यावेळी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी त्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधला. यावेळी त्यांची पत्नी केतकी शुक्ला, मुलगा निरव शुक्ला उपस्थित होते.


Previous Post Next Post