सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (ता.४) : आदिवासी समाजातील वंचित घटक अजूनही न्यायापासून कोसोदूर असून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मारेगाव शहरातील युवा नेतृत्वाची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे'च्या मारेगाव शहराध्यक्ष पदी दोन युवकांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली मारेगाव शहराध्यक्षपदी निलेश आत्राम व सचिव पदी सोनू गेडाम यांची निवड करण्यात आली आहे.
मारेगाव शहर हे अनेक समस्याचे शहर असून आदिवासी समाजातील बहुतांश कुटुंब शासकीय योजनेच्या माहिती पासून कोसोदूर आहे. त्यांना शासकीय योजनेची माहिती मिळवण्यासाठी शहरात आदिवासी कुटुंब येतात विविध योजनांची माहिती शासकीय कार्यालयाकडून दिली जात नसल्याने त्यांना शासकीय योजनेची माहिती व योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नरेश गेडाम यांच्या आदेशानुसार मारेगाव तालुका अध्यक्ष सुमित गेडाम यांनी नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मारेगाव तालुका उपाध्यक्ष राजु सिडामसह अनेक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.