गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा जिल्हा चा वायगाव "गोंड" च्या नावबदल निर्णयाला विरोध "राष्ट्रीय एकता च्या नावाखाली पहिला घाव या देशाच्या मुळवंशी गोंड समुदाय वर"- चंद्रशेखर मडावी (जिल्हाध्यक्ष.गों.ग.पा.)


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वर्धा, (ता.२५) : महाराष्ट्र सरकारने ज्या गावांच्या,वस्त्यांच्या,रस्त्यांच्या नावाची ओळख जाती च्या आधारे आहे अश्या नावांना राष्ट्रीय एकता च्या दृष्टीने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.त्या बाबत शासन निर्णय काढला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) या गावापासून होणार असल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली होती आणि त्याकरिता तात्काळ एक समिती गठीत करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळाल्याने गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा द्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांच्या नेतृत्वात या शासन निर्णयानुसार गोंड या समूहवाचक नावाचा नाव बदलविण्याच्या शासन निर्णयाचा विरोध जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन च्या स्वरूपात केला.महाराष्ट्र शासनाने गोंड हे जातीवाचक नाव नसून समूहवाचक नाव आहे याचा अभ्यास करावा या देशाचा मुळवंशी म्हणून गोंड नावाला मान्यता आहे.गोंड जर जातिवाचक नाव असते तर "गोंडवाना एक्स्प्रेस, गोंडवाना युनिव्हर्सिटी" सारखी नावं राष्ट्रीय स्तरावर मान्य झाली असती का..? असा प्रश्न सुद्धा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने निवेदनात विचारण्यात आला,सरकार आदिवासींची मूळ ओळख नष्ट करण्याचा मागे लागली असून गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा-वर्धा च्या वतीने या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला.
गोंड नावाने ओळख असलेल्या गावांच्या रस्त्यांच्या,वस्त्यांच्या नाव बदलविल्याने राष्ट्रीय एकता निर्माण होत असेल तर आडनाव चा उल्लेख असलेल्या गावांची सुद्धा नावे बदलविण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन त्यावर सर्वप्रथम अंमलबजावणी केली पाहिजे असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना चंद्रशेखर मडावी यांनी चर्चेदरम्यान सुचवले.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शासनाने आदिवासींच्या सहनशीलता चा अंत बघू नये.शासनाने ईतर कोणाची नाव बदलवायची असल्यास खुशाल बदलवावी परंतु गोंड नाव असलेल्या किंवा आदिवासींची ओळख असलेल्या ईतर कोणत्याही नावाची बदल केल्यास जिल्हाभर "गोंडवाना गणतंत्र पार्टी" उग्र स्वरूप धारण करेल,असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या द्वारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी दिला. यावेळी गों.ग.पा. चे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष दमडुजी मडावी, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मसराम, सेलू तालुकाध्यक्ष अजित इरपाते, आदिवासी विकास परिषद युवाध्यक्ष सचिन नराते, रोशन चिकराम, शत्रुघ्न सडमाके, अमोल सडमाके, गजानन सडमाके, मंगेश मसराम, मनोज सिडाम, प्रवीण सराटे ईत्यादी उपस्थित होते.
गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा जिल्हा चा वायगाव "गोंड" च्या नावबदल निर्णयाला विरोध "राष्ट्रीय एकता च्या नावाखाली पहिला घाव या देशाच्या मुळवंशी गोंड समुदाय वर"- चंद्रशेखर मडावी (जिल्हाध्यक्ष.गों.ग.पा.) गोंडवाना गणतंत्र पार्टी वर्धा जिल्हा चा वायगाव "गोंड" च्या नावबदल निर्णयाला विरोध "राष्ट्रीय एकता च्या नावाखाली पहिला घाव या देशाच्या मुळवंशी गोंड समुदाय वर"- चंद्रशेखर मडावी (जिल्हाध्यक्ष.गों.ग.पा.) Reviewed by सह्याद्री चौफेर on June 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.