सह्याद्री न्यूज नेटवर्क |
बल्लारपूर, (ता.२५) : देशात कोरोना महामारी मुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसान झाले,विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारी मुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार हरपले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक शुल्क कसे भरायचे हाच प्रश्न पडला आहे ? यामुळे विद्यार्थी खूप चिंतेत असून, पालक वर्गात परीक्षा शुल्काबाबत प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्क तात्काळ माफ करण्यात यावे व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क त्वरित परत करण्यात यावे यासाठी माननीय राजूभाऊ झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज दि.२५ जूनला सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर तर्फे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कुलसचिव मा.अनिलजी चिताडे सर यांच्याशी परीक्षा शुल्काबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले लवकरच याबाबत विद्यार्थी हितकारक निर्णय होणार असे विद्यापीठ प्रशासनामार्फत कळविण्यात आले.
निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर चे सिद्धांत पुणेकर, स्वप्निल सोनटक्के, फारुक शेख, गुंजन वानखेडे, रुपेश चंदनखेडे, सचिन ठीपे, प्रणय मडावी, रोशन ढेंगळे, चेतन गेडाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्क माफ करा - सम्यक विद्यार्थी आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2021
Rating:
