लाखापूर ते आकापूर रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहेत तरी कुठे?


सह्याद्री न्यूज | विवेक आवारी
मारेगाव, (ता.२६) : तालुक्यातील लाखापूर ते आकापूर या गावाचा रस्ता बहुतांश उखडून गेल्याचे चित्र आहे. तर ठिकठिकाणी खड्डे ही पडलेत. 'एक ना धड भाराभर चिंद्या' अशी अवस्था आहे.

लाखापूर ते आकापूर या रस्त्याकडे संबधीतांचे अजिबात लक्ष नसून दुर्लक्षित असल्याचे लोकं सांगतात. या मार्गाने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करणे हेच सध्याचे चित्र पहावयास मिळते आहे. हा 
जवळपास तीन ते चार किमी अंतरा च्या ही पलीकडे या रस्त्याची गिट्टी उखडून कुठे कुठे खड्डे पडले आहे. या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या च्या कमरेत,मानेच्या मणक्यात दुखणे वाढवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची साधी डागडुग्गी सुद्धा केली नसल्याचे बोलल्या जात आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे?, असा प्रश्न या उखडलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून साहजिक च उपस्थित होतो.

वेळेची बचत, आरोग्याच्या दृष्टीने, शालेय विद्यार्थी, तालुक्यातील शासकीय कामं अशा विविध सोयीकरिता मार्ग सुखकर व्हावा या उद्देशाने ग्रामीण रस्ते शहराला जोडले तर गेलेत, मात्र या रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून या मार्गाने चारचाकी वाहन घेऊन जाणे येणे कठीण काम झाले आहे. सदर रस्ता निदान दगडूग्गी तरी करून द्यावा अशी मागणी आहे. 


लाखापूर ते आकापूर रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहेत तरी कुठे? लाखापूर ते आकापूर रस्त्याची दयनीय अवस्था  लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहेत तरी कुठे? Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.