टॉप बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे योगसंस्कार शिबीर संपन्न

                        (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (ता.२६) : शिक्षण प्रसारक मंडक विध्याळ्यातर्फे दि.१५ जून ते २१ जून २०२१ ह्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य संस्कार शिबिराचे आयोजन आभासी स्वरूपात करण्यात आले होते. आभासी स्वरूपातील या योह शिबिराच्या माध्यमातून योगासने सूक्ष्म संधी व्यायामप्रकार आणि सूर्य नमस्काराची माहिती व समंत्र सराव घेण्यात आला.

संस्काराच्या दृष्टीने बीजारोपण म्हणून विद्यार्थ्यांपुढे एका सुभाषितांचे वाचन व त्याचा अर्थ सांगणे,प्रार्थना पठण व तिची आवश्यकता समजावणे आणि रोज एक बोधकथा असे स्वरूप ठरवून त्याप्रमाणे त्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच दंडस्थिती बैठक स्थिती शयनस्थिती व विपरीत शयनस्थिती करण्यात येणारी आसने,वर्णन,कृती,व फायदयांसह समजावून सांगण्यात आली.

विद्यालयातील श्री.मडावी व गारघाटे सर, सौ.कचवे, नवघरे व मेश्राम या शिक्षकांनी संस्कारक्षम बोधकथा सांगितल्या. शिबिराचे सूत्रसंचालन शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री.किरण बुजोने ह्यांनी केले.

श्री.प्रमोदजी क्षीरसागर मुख्याध्यापक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय ह्यांनी उद्घाटनपर व समारोपीय उदबोधन करून शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाचे व पालकांचे आभार मानले. सदर उपक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्माच्यारी सहकार्य लाभले आंतरराष्ट्रीय योगदिनी योगासनाच्या सरावनंतर शिबिराची सांगता करण्यात आली..
Previous Post Next Post