सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (ता.२५) : संपूर्ण विश्वामध्ये वैशिक कोविड-१९ कोरोना महामारी मुळे भयानक संक्रमाची भिषण व्यक्ती प्रभावित झाला असून राज्यामध्ये लोकांना रोजी-रोजगार सहित भयानक समस्या निर्माण झाल्या आहे.देशामध्ये पेट्रोल, डिझेल भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे अनेक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. याचे परिणाम शेतकरी- शेतमजूर तृतीय व चतुर्थ कर्मचारी व्यापारी संपुर्ण व्यवसाय प्रभावित झाला आहे. ज्यामुळे लोकांचे वावरीक जीवन अस्तव्यस्त झाले आहे. कमरतोड महागाई भरसाठ वाढ झाल्यामुळे देशात आर्थिकस्थितीचे संकट निर्माण झाले आहे. म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या मागणी आहे की शेतकरी- शेतमजूर मजदूर तृतियव्ही चतुर्थ वर्ग यांना तात्काळ आथिर्क सहाय्यता राशी मिळायला पाहिजे पेट्रोल, डिझेल मध्ये सामान्य लोकाला 50% अनुदान राशी नागरिकांच्या खात्या मध्ये डी. बि. टी. च्या माध्यमातून जमा व्हायला पाहिजे.
वरील मागण्याचा शासनाने गंभीर विचार करून महागाईवर तोडगा कडून समस्येतून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथा शासनाच्या धोरणा विरोधात पूर्ण महाराष्ट्र गोंडवाना गणतंत्र पार्टी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी.
दि.24 जून 2021 ला मा.जिल्हाधिकारी साहेब नागपुर तर्फे मा.रामनाथजी कोवींद राष्ट्रपती आणि मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देशात वाढलेली कमरतोड महागाई आणि महाराष्ट्र राज्यातील वाढलेल्या अनेक समस्यबाबत गोंगपाच्या पदाधिका~यांनी व अनेक कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.
यावेळी हरिशजी उईके(प्रदेश अध्यक्ष), राजेश इरपाते (प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष), प्रतिमा मडावी (प्रदेश अधक्ष म.प्रकोष्ट), महेश बमनोटे(प्रदेश कोषाध्यक्ष), विठ्ठल उईके (प्रदेश संपर्क प्रमुख), एड.आशिश उईके(प्रदेश प्रवक्ता), धनराज मडावी (जिल्हाध्यक्ष नागपुर), गंगा टेकाम (जिल्हाध्यक्ष नागपुर.म.प्रकोष्ट), शिवकुमार उईके (जिल्हा महासचिव.नाग.), सतीश नाईक(नाग.शहर अध्यक्ष यु.मो.), सौरभ मसराम (जिल्हा सचिव यु.मो.) तसेच रेखाताई वडमे, दिनेश सिडाम, अंकुश करनाके, पदमाकर मरसकोल्ह, रोहीत वडमे, निकेश जनबंधु.इ.पदाधिकारी उपस्थित होते.
गोंगपाचे मा. राष्ट्रपती महामहिमला निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2021
Rating:
