मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ७ वर्ष पूर्ती सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत श्री.अनिल डोंगरे यांचे कडून वाढदिवसाचे औचित्य साधून मौजा विचोडा येथील दिव्यांग,कोविड योद्धा व कामगारांना मदत भेट देऊन गावकऱ्यांनी केला वाढदिवस साजरा.
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (ता.५) : माझे राजकीय गुरू मा.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांचे मार्गदर्शन व माध्यमातून गावकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असं माणून मग शासकीय योजना असो की, गावाचा कायापालट असो, या अडचणीच्या काळात धाऊन जाणे असो, प्रत्येक क्षणी गावकऱ्यासोबत गावच्या समस्या सोडवून गावकऱ्यांच्या मतदानरुपी आशिर्वादातून सतत तीनदा निवडून येऊन गट ग्राम पंचायत विचोडा,चांदसूर्ला या तीन गावाची सरपंच,उपसरपंच पदाची धुरा आपल्याकडे ठेऊन गावाचा चौफेर विकास साधून गावकऱ्यांचा विश्वास,प्रेम संपादित करून दरवर्षीप्रमाणे आज माझा वाढदिवस गावकऱ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाअंतर्गत श्री.अनिल डोंगरे यांचे कडून मा.पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ७ वर्ष पूर्ती सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना सायकल भेट, मृत कोविड-19 व्यक्तीच्या पत्नीला साडी-चोळी व किराणा, धान्य किट ची मदत करण्यात आली. तसेच फोर व्हीलर, टू व्हीलर शोरुम, वर्कशॉप मधील काम करणाऱ्या कामगारांना किराणा, धान्य किट ची मदत भेट देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला श्री.प्रमोद जाधव, श्री.राजू डोंगरे, श्री.वांसतराव महले, श्री.गजानन महले व मदत लाभार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सावन महल्ले, पवन डोंगरे, सागर महल्ले, गणेश महल्ले यांनी विशेष परिश्रम घेतले.
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ७ वर्ष पूर्ती सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत श्री.अनिल डोंगरे यांचे कडून वाढदिवसाचे औचित्य साधून मौजा विचोडा येथील दिव्यांग,कोविड योद्धा व कामगारांना मदत भेट देऊन गावकऱ्यांनी केला वाढदिवस साजरा.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2021
Rating:
