घर भाड्याचे पैसे मागितल्याने भाडेकरूंनी केली घर मालकालाच मारहाण

                      (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.५) : घर भाड्याचे पैसे मागणाऱ्या घरमालकाशीच भाडेकरूंनी वाद घालत त्याला मारहाण केल्याची घटना काल रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास शहरातील तेलीफैल येथे घडली. भाड्याने राहणारे दोघे व इतर एक जण अशा तिघांनी मिळून वडिलांना लाथा बुक्यांनी मार केल्याने त्यांना जबर दुखापत झाल्याची तक्रार मुलाने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. मुलाच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या इसमाला आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर नंतर डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले. 
याबाबत उदय संतोष कारिंगवार (१९) रा. रंगनाथ नगर याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार त्याचे तेलीफैल येथे वडिलपार्जित घर असून वडिलांना दारूचे व्यसन असल्याने ते मागील तीन चार दिवसांपासून तेलीफैल येथील घरी एका वेगळ्या खोलीत रहात होते. बाकी सर्व परिवार हा रंगनाथ नगर येथे राहतो. तेलीफैल येथील घरात चार भाडेकरू आहेत. या घरात राहणाऱ्या एका महिला भाडेकरूने रात्री १२.३० वाजता उदय याला फोन करून त्याचे वडील संतोष भैय्याजी कारिंगवार (४७) याच्याशी त्याचेच भाडेकरू असलेले दोघे व अन्य एका जनाने वाद करीत जबर मारहाण केली. उदय तत्काळ तेलीफैल येथील घरी आला असता त्याला वडील जख्मी अवस्थेत पडून दिसले. वडिलांना घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता वडिलाने भाडेकरू असलेल्या प्रदीप तुफाने केवट (३७) रा. तेलीफैल, शेख रहीम शेख मुखत्यार (३१) रा. तेलीफैल व भीम नगर येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने त्याला काठीने व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनी घर भाड्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याचे वडिलांनी सांगितले. वडिलांच्या डोक्याला रक्त लागले होते. तर उजव्या गालाला जखम झाल्याचे दिसून आले. त्याला प्रथम ग्रामीण रुग्णालयात तर नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी तिनही  आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.



घर भाड्याचे पैसे मागितल्याने भाडेकरूंनी केली घर मालकालाच मारहाण घर भाड्याचे पैसे मागितल्याने भाडेकरूंनी केली घर मालकालाच मारहाण Reviewed by सह्याद्री चौफेर on June 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.