आकृती सेंटर पॉईंट व हातोडा तर अनेक्स हॉटेल रिकामी करावे. - डॉ राजन माकणीकर


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, दि (ता.९) : अनाधिकृतरीत्या बांधलेले आकृती सेंटर पॉईंट वर हातोडा तर अनेक्स हॉटेल रिकामी करवून घ्यावे व संबंधित अधिकारी व विकासक विमल शहावर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआ डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी नुकतीच तक्रार केली असून त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाठग आकृती हब टाऊन विकासक विमल शाह व मास्टर मांईड महादलाल मुरजी पटेल ने सर्व पुनर्वसित इमारतींना मूलभूत सुविधा पुरविल्या नसून बालवाडी, समाजकल्याण केंद्र, सोसायटी कार्यालय देणे नियमात असून सुद्धा बहुतांश इमारतींना अद्यापही या सुविधा दिलेल्या नाहित. 

अनेक्स नावाचे हॉटेल हे याच अश्या जागेवर बांधण्यात आले आहे. पॉकेट क्रमांक ४ मधील करमणुकीचे मैदान आकृती/हब टाऊन विकासकाने गिळंकृत करून एमआयडीसी व प्रकल्पबधितांची फसवणूक केली आहे.

नियमानुसार ८% जागा ही करमणुकीच्या मैदानासाठी द्यावयाची असतांना विमल शहाने अस ना करता इमारती मधील सामायिक अंतरात तुकड्या तुकड्यात दिली आहे हे काम सुद्धा गैर आहे. 
आकृती सेंटर पॉईंट ही प्रकल्पग्रस्थानच्या बालगोपालांसाठी खेलाच्या मैदानासाठी नियोजित असतांना या जागेचा विक्री च्या FSI मध्ये समावेश करून सर्व नियम ना जुमानता कॉलर टाइट करून फिरत आहे.


शासनाच्या प्रकल्पात चोरी करून शिरजोरी करणाऱ्या महाठग विमल शहा वर ४२० चा गुन्हा नोंदवावा, व आकृती सेंटर पॉईंट ही इमारत तात्काळ निष्कशित करावी व आजपर्यंत नागरिकांची पिळवणूक व प्रशासनाची दिशाभूल करून किरायच्या स्वरूपात कमावलेले सर्व पैसे एमआयडीसी ने वसूल करावेत.

मंजूर नकाश्याप्रमाणे मूलभूत सुविधा संपूर्ण इमारतीत देने बंधनकारक आहे, त्यामुळे तात्काळ मूलभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात व हॉटेलची जागा १५ दिवसात रिकामी करून एमआयडीसी ने ताब्यात घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा डॉ. राजन माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिला आहे.
आकृती सेंटर पॉईंट व हातोडा तर अनेक्स हॉटेल रिकामी करावे. - डॉ राजन माकणीकर आकृती सेंटर पॉईंट व हातोडा तर अनेक्स हॉटेल रिकामी करावे. - डॉ राजन माकणीकर Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.