हरी भाऊ तोडासे यांचे यवतमाळ येथे निधन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (ता.९जून) : तालुक्यातील नरसाळा येथील हरी भाऊ तोडासे (३०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
हरीभाऊ यांना दोनदिवसा आधी Paralysis (लकवा) मारल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, काल रात्री ठीक १२.३० वाजताच्या सुमारास त्यांचा ग्रामीण रुग्णालय यवतमाळ येथे मृत्यू झाला असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
हरिभाऊ यांच्या पश्चात आई,वडील व दोन भाऊ असा त्यांचा आप्तपरिवार आहे.

 
हरी भाऊ तोडासे यांचे यवतमाळ येथे निधन हरी भाऊ तोडासे यांचे यवतमाळ येथे निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.