टॉप बातम्या

पिंपरी-चिंचवड प्रभागात श्री शिव शंभू प्रतिष्ठान समितीकडून माता भगिनींचा सन्मान..


सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर
पुणे, (ता.२४) : आज रोजी हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस जो हिंदू सणापैकी एक महत्वाचा सण, महिलांसाठी महत्वाचा, वटपौर्णिमा सण साजरा करताना श्री शिव शंभू प्रतिष्ठानने याही वेळी आदर्श माता भगिनींचा सत्कार करून साजरा केला.

श्री शिव शंभू प्रतिष्ठान समितीने आपल्या पिंपरी-चिंचवड प्रभागातील आदर्श माता भगिनींना एकत्र जमवून वटपौर्णिमेचे महात्म्य सांगून, त्यांच्या हस्ते वटपूजन करून, अध्यात्मिक गिते आणि उखाणे यांचा आस्वाद दिला. यात आदरणीय सुनिताताई चव्हाण यांनी प्रामुख्याने योग्य मार्गदर्शन केले. प्रदिपभाऊ बांद्रे, सुनिलतात्या पालकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली आणि नियोजन केले.

श्री शिव शंभु प्रतिष्ठान समिती कार्यकर्ते स्वामीनाथ यादव, अधिक भोसले, सामाजिक कार्यकर्ते अतुलदादा खोपटकर यांच्या सहभागात कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. कार्यक्रमात सदिच्छा भेट म्हणून पवित्र तुळस रोप भेट माता भगिनींना देण्यात आली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भगिनींनी प्रतिष्ठान समिती कार्यकर्त्यांना गुलाब-नारळ भेट स्वरूपात देऊन आभार व्यक्त केले.
कार्यक्रमतील सहभागी माता भगिनींपैकी लता दीक्षित, मीनाक्षी सोमवंशी, सुनंदा पेठे, प्रेमलता पुजारी यांनी या कार्यक्रमातील संस्काराचे महत्व आवडल्याचे आवर्जून सांगितले. सुरेखा पांचाळ, कृष्णा महामुनी पंडित, रूपाली पंडित, निवेदिता ठाकरे, सोनाली जाधव,  मोरे ताई, वंदना घाडगे आशा बेंडे, मंजू देवी शर्मा यांना नियोजन खूप छान वाटले. बर्‍याच महिलांचा सहभाग हिच कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडल्याची पोच पावती असून नागरिकांनी समितीचे अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post