सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (ता.२४) : शहरातील प्रभाग क्र. ४ मधील प्रमोद ठेंगणे या ३३ वर्षीय विवाहित युवकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली होती. पंचनामा दरम्यान,मृतकाच्या खिशात चिट्ठी मिळाल्याने एकच खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले होते, मिळालेल्या चिट्ठीत शेजारील लोकांचे नावं लिहून असल्याने त्यांचे वर कार्यवाही होणार की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना, नातेवाईकांनी "आधी त्यांना अटक करा, तेव्हाच आम्ही मृत्यूदेहा वर अंत्यसंस्कार करू" असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रमोदला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या घरा शेजारील संशयित आरोपी १) आकाश पंढरी भगत (३०), २) पंढरी बंडू भगत (५३),
३) छाया पंढरी भगत (४५) यांचेवर भांदवी च्या
कलम ३०६,५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी दोन आरोपीना काल रात्री अटक केली. व तिसरा आरोपी महिला असल्याने तीला आज सकाळी अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणातील आरोपीना जो पर्यंत अटक करणार नाही तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तीन संशयितांना अटक केली आहे.
प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरण: मारेगावातील संशयित आरोपिंना अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 24, 2021
Rating:
