यवतमाळात थरार! अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (ता.२४) : शहरातील स्टेट बँक चौकात अनोळखी इसमानी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक २३ जून रोजी रात्री साडे आठ वाठ वाजता दरम्यान घडली.

करण परोपटे (रा. चांदोरे नगर) असे मृताचे नाव आहे. वाळू घाटाच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहरचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेने यवतमाळ शहरात एकच खळबळ उडाली. आरोपी कोण हे नेमके हे कळू शकले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना टिप्स दिल्या.
यवतमाळात थरार! अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या यवतमाळात थरार! अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.