सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नांना यश, गोंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षा शुल्कात १० टक्क्याची कपात व २०२१-२२ करिता विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क माफ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बल्लारपूर, (ता.२९) : देशात कोरोना महामारी च्या प्रादुर्भाव मागील दीड वर्षापासून आहे.विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेण्याकरिता जाऊ शकले नाही.संपूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले.कोरोना महामारी मुळे विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक अडचणीत होते. अनेक विद्यार्थी कोरणाग्रस्त होते, विद्यार्थ्यांचे आधार हरपले, विद्यार्थ्यांचे आर्थिक हाल झाले, विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अशातच महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठ प्रशासन द्वारे अनेकदा सांगण्यात आले कि, महाविद्यालयीन शुल्क व परीक्षा शुल्क वेळेवर भरा परंतु कोरोना महामारी मुळे विद्यार्थी व पालक वर्ग आर्थिक अडचणीच्या संकटात सापडला त्यामुळे परीक्षा शुल्क व महाविद्यालय शुल्क भरायचे कसे ? असे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात येऊ लागले त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

आद.बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडी प्रणित विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन बल्लारपूर चे कार्यकर्ते स्वप्निल सोनटक्के, सिद्धांत पुणेकर, प्रथम दुपारे, गुंजन वानखेडे, फारुक शेख, प्रणय मडावी, भोजेंद्र दुबे, सचिन ठीपे, रुपेश चंदनखेडे यांनी मा.राजू भाऊजी झोडे विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात सतत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन शिक्षणमंत्री, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, बल्लारपूर तालुक्याचे तहसीलदार त्यांना अनेकदा निवेदने दिले.
अशातच विद्यार्थी हितकारक असा निर्णय गोंडवाना विद्यापीठ द्वारे घेण्यात आला विद्यापीठाद्वारे येत्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क, १०० टक्के माफ करण्यात आले असून, ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व पर्यावरण शुल्क यामध्ये ५० टक्के ही सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठ द्वारे घेण्यात आलेला आहे.सोबतच उन्हाळी २०२० परीक्षा करिता सर्व नियमित विद्यार्थ्यांना १० टक्के फी कपात करण्याच्या निर्णय सुद्धा मा.व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे सदर निर्णयाचे सर्व महाविद्यालयाने काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे आव्हान विद्यापीठाचे मा.कुलगुरू, प्रा.श्रीनिवास वरखेडी व मा.प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी केले आहे असे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नांना यश, गोंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षा शुल्कात १० टक्क्याची कपात व २०२१-२२ करिता विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क माफ सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नांना यश, गोंडवाना विद्यापीठाद्वारे परीक्षा शुल्कात १० टक्क्याची कपात व २०२१-२२ करिता विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क माफ Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.