सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२९) : वरली मटक्याचा खेळ चालविणाऱ्या एका आरोपीला डीबी पथकाने अटक केली आहे. मटका जुगारावर पैशाची बाजी लावत असतांना पोलिसांनी या आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. शहरातील एकता नगर येथील नगर परिषद गाळ्यामध्ये सुरु असलेल्या मटक्यावर आज दुपारच्या सुमारास डीबी पथकाने धाड टाकली. पोलिस आल्याची चाहूल लागताच मटका खेळणारे व मटक्याची पट्टी फाडणारे पळत सुटले. तर मटक्याची पट्टी फाडणारा एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शहर व तालुक्यात मटका खेळला जाणार नाही, याची पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असतांना देखील काही अवैध धंद्यांशी जुळलेल्या व्यक्तींकडून चोरून लपून मटका चालविला जात आहे. शहरातील एकता नगर येथील नगर परिषदेच्या गाळ्यामधे मटका सुरु असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकून मटक्याची पट्टी फाडणाऱ्या एका आरोपीला अटक केली. पोलिस आल्याचे कळताच काही जण सैरावैरा पळाले. तर मटका जुगारावर पैशाची बाजी खेळवणारा एक जण पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी मटका पट्टी फडणाऱ्या अब्दुल रज्जाक शेख मुख्तार (३६) रा. वार्ड नंबर ४, मस्जिद मागे मुकुटबन याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याच्या जवळून १०८० रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, दीपक वान्ड्रूसवार, पंकज उंबरकर, हरिन्द्रकुमार भरती यांनी केली.
एकता नगर येथील मटक्यावर पोलिसांची धाड, एका आरोपीला घेतले ताब्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2021
Rating:
