टॉप बातम्या

छतावर रेन हार्वेस्टिंग लावा आणि पाच हजार रुपयांचे अनुदान मिळवा

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (ता.१७) : घराच्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची यंत्रणा लावून मनपाकडून ५ हजार रुपयांचे अनुदान मिळवा. असे चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर च्या वतीने आवाहन करण्यात आले.
 
पाणी वाचवा, जीवन वाचवा...!
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर च्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आपल्या घराच्या छतावर 'रेन वाटर हार्वेस्टिंग' लावा आणि पाच हजार रुपयांचे अनुदान मिळवा. ज्यामध्ये मनपा -2.5 हजार प्लस वेकोली CSR-2.5 हजार असे मिळून पाच हजार रुपयांचे अनुदान मिळवता येईल सोबत च 3 वर्षापर्यंत मालमत्ता करात दोन टक्के सवलत मिळणार असल्याचे सांगितले जाते.
अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या ऑफिसीयल ट्विट वरून देण्यात आली.

अधिक माहितीसाठी 7020262070,8329334767,9975057030 ह्या क्रमांक संपर्क साधा.

Previous Post Next Post