टॉप बातम्या

खातेरा शिवारात रान डुकरांचा धुमाकूळ


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
झरी, (ता.१७) : झरी तालुक्यात शेती मशागती काम ८० टक्के पूर्ण झाली. काहींनी आपल्या शेतात बिबियाणे पेरणी केली आहे. मात्र, नवरदेव कुठे आहे, आम्ही वरात घेऊन आलोय असाच प्रकार घडला म्हणायला हरकत नाही. झुंड च्या झुंड खातेरा शेतशिवारात रान डुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

चक्क, 
या रान डुकरांनी बिबियाणे शेतात पेरलेली उकरून खायला सुरुवात केली. ज्या शेतातून हे रान डुकर गेलेत त्या पिकांचा या डुकरांनी तुडवून मातेरा केल्याचं दिसून येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना या रानटी डुकरांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

वनविभागाने या रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. 
Previous Post Next Post