सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (ता.१७) : जिल्ह्यातील बोरी अरब जवळ यवतमाळ ते दारव्हा रोडचे काम वरील पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. मात्र, काम चालू असल्याचे ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे चार चाकी गाडीचा अपघात झाला,असे बोलल्या जात आहे.हा अपघात शेलोडीजवळ सुरु असलेल्या पुलाचे बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी झाल्याचे चित्र आहे. चारचाकी गाडीचा अपघात झाला गाडी सरळ पुलासाठी खोदलेल्या गड्यात गेली, त्यामध्ये युवक गंभीर झाला. वाहनार्थी जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसताच,नागरिक धावून आले व त्याला उपचारासाठी पाठवण्यात आले.
पुलाचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकार चे तिथे काम सुरू असल्याचे फलक नाही. असा संताप प्रवाश्यांनी व्यक्त केला. जखमी ला दारव्हा येथील शासकीय रुग्णालयात भरती केले.
अनेक वर्षांपासून यवतमाळ दारव्हा रोडचे काम अतिशय कासवगतीने काम सुरू असून, त्यामुळे अनेक अपघात होत आहे. सदर रोडचे बांधकाम भ्रष्टचारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे रखडल्याचे बोलले जाते.
रस्त्यावर फलक नसल्याने कार गेली गड्यात, जखमीला रुग्णालयात केले दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 17, 2021
Rating:
