सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.१७) : सामाजिक जीवनाशी निगडित अनेक चांगल्या गोष्टींवर पटकथा लिहून त्याचे शॉर्टफिल्ममध्ये रूपांतर करणाऱ्या वणी येथील युवा दिग्दर्शक अक्षय रामटेके यांच्या आगामी 'रेडियो 1947' या शॉर्ट फिल्मचा टिझर नुकताच युट्युबवर रिलिज झाला आहे. या लघुपटामध्ये वणी (यवतमाळ) परिसरातीलच सर्व कलाकार व तंत्रज्ञ आहेत. अविनाश शिवनीतवार, किरण येसेकर, मोना पेंदोर यांच्यासह हर्षद गहुकर, मुकेश दौलतकर, गणेश आसुटकर यांनी यात भूमिका केली आहे. १८ जून रोजी ही फिल्म पूर्णपणे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी रेड्डी असल्याचे सांगितलं जात आहे. 'रेडियो 1947' ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एका रेडियो प्रेमी तरुणाची कथा आहे. त्याने स्वातंत्र्याच्या लढाईत त्याचे आई वडील गमावले आहे. तरुणाचे आई वडील मृत्यूआधी मुलाला रेडियो गिफ्ट देतात. आई वडिलांची शेवटची आठवण असलेला हा रेडियो, तरुणाचे रेडियो प्रेम त्याचा त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम, स्वातंत्र्य मिळणे इत्यादी भोवती ही कथा फिरते.
या लघुपटाची कथा हर्षद गहुकर यांनी लिहिली आहे. सिनेमॅटोग्राफी अतुल खोब्रागडे यांची तर वेशभुषा शंकर घुगरे यांची आहे. दिग्दर्शक अक्षय रामटेके यांनी स्थानिक कलाकार व तंत्रज्ञ यांना सोबत घेऊन अनेक शॉर्टफिल्म व म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. दोन महिन्याआधीच त्यांनी दिग्दर्शीत केलेली शॉर्टफिल्म स्माईल ही युट्युबवर प्रकाशित झाली आहे. या लघुपटाला प्रेक्षक मायबापांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वांचे खूप आभार असे 'सह्याद्री ई न्यूज' च्या माध्यमातून व्यक्त करतो. आता परत माझी शॉर्ट फिल्म आपल्या भेटीस मी घेऊन येत आहे. उद्या दिनांक १८ जून रोजी अक्षय रामटेके या युट्युब चॅनल वर सकाळी १०:०० वाजता, 'रेडिओ 1947' ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित होत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पाहावी व आपले मत कमेंट बॉक्स मध्ये कळवावे असे,आवाहन या लघुपटाचे निर्माते दिग्दर्शक अक्षय रामदास रामटेके यांनी केले.
वणी येथील युवा दिग्दर्शकाचा "रेडिओ १९४७" लघुपट १८ जून ला रिलीज
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 17, 2021
Rating:
