सदनिकेच्या प्रतीक्षेत अखेर प्राणज्योत मालवली-(रिपाई डेमोक्रॅटिक चे माकणीकर करणार पाठपुरावा)


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.१७) : पोलीस दलातुन सेवानिवृत्त झालेले व्यंकट बिरादार सदनिका व थकीत भाडे धनादेशाच्या प्रतीक्षेत वाट पाहून मरण पावले, त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा रिपाई डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

एमआयडीसी प्रशासना सोबत सदनिका वाटप आणि भाडे धनादेशसाठी व्यंकट बिरादार यांनी, दि १७/५/१६, पासून दि. १०/१०/२०१९ पर्यंत पत्रव्यवहार केला आहे. 

त्यानुसार पॉकेट क्र. ५ अ. क्र. १९९५,
पॉकेट क्र. ५ अ. क्र. ११८०, पॉकेट क्र. ४ अ. क्र. ६४५ व पॉकेट क्र. ४ अ. क्र. ६४६ या पात्र झोपडी धारकांना पात्र सिद्धतेपासून भाडे धनादेश अदा करण्यात आले नसून मा उपअभियंता यांनी आकृती निर्माण प्रा लिमिटेड च्या नावाने दि १८/१०/२०१९ रोजी पत्र जारी केले आहे.

एमआयडीसी प्रशासनाने आकृती विकासकाला स्पष्ट सांगितले आहे की, नमूद पात्र झोपडी धारकांना पुनर्वसन योजनेअंतर्गत नियमानुसार सदनिका वाटपाबाबतची कार्यवाही करून तोपर्यंत थकीत भाडे धनादेश अदा करण्यात यावे.

मात्र: विकासक विमल शहाणे एमआयडीसी च्या "त्या"पत्राला केराची टोपली दाखवली व योजनेच्या लाभापासून दूर केले. किंतु: त्यांच्या पश्चयात योजनेचा लाभ त्यांच्या मुलांना मिळवून देणार असल्याची ग्वाही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर दिली.
सदनिकेच्या प्रतीक्षेत अखेर प्राणज्योत मालवली-(रिपाई डेमोक्रॅटिक चे माकणीकर करणार पाठपुरावा) सदनिकेच्या प्रतीक्षेत अखेर प्राणज्योत मालवली-(रिपाई डेमोक्रॅटिक चे माकणीकर करणार पाठपुरावा) Reviewed by सह्याद्री चौफेर on June 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.