सिडको एन सहा मथुरानगर, संभाजी काॅलनी जी सेक्टर, ई सेक्टर भागातील नागरीकांना गेल्या 4 वर्षापासून काळया पाण्याची शिक्षा..


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (ता.१३) : सिडको एन सहा मथुरानगर, संभाजी काॅलनी ई सेक्टर जी, सेक्टर , परिसरात गेल्या काही दिवसापासुन नळाला दुषित पाणी येत असल्याची समस्या ताजीच असतांना पुन्हा याच भागातील मथुरानगर घर क्र E1-29/8, पासुन पुढे संपूर्ण गल्लीला ड्रेनेजचे पाणी आल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या सदर्भामध्ये येथील स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन वार्ड अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला कळवलेले आहे. याभागातील ड्रेनेजलाईन ही वारंवार भरत असते ही ड्रेनेजलाईन आणि वार्डाला जलपुरवठा करणारी जलवाहीनी ही आजुबाजुलाच असल्याने या ड्रेनेजलाईन मधील तुबलेले दुर्गंधीयुक्त घाण पाणी हे जलवाहीच्या आत जाऊन संपूर्ण वार्डाला घाण आणि दुषीत पाणी येत असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. 

"एक महीन्यापूर्वी मथुरानगरमध्ये मनपाने खासगी कत्राटदारा मार्फत ड्रेनेजलाईनमधील जुने पाईप खोदून काढले आणि स्वच्छ करून तेच पाईप बसवुन बोगस पद्धतीने काम केल्याने ड्रेनेजलाईनला एक महिन्याच्या आत गळती लागुन नळाद्वारे ड्रेनेजचे पाणी येत आहेत. ज्या ठेकादारामार्फत ड्रेनेजचे काम झाले त्याला काळ्या यादीत टाकुन दिलेले बिल परत घ्यावे केलेल्या बोगस कामाचा पंचनामा करून त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. ड्रेनेजलाईनच्या लागुनच असलेले नळ कनेक्शन कापावे, जुनाट झालेली ड्रेनेजलाईनचे बोगस काम पुन्हा एकदा चागल्या पद्धतीने करावे. खराब व मोडकळीस असलेले चेबर नवीन टाकावे आणि ड्रेनेजलाईनची गळती कायमस्वरूपी थाबवावी. "
  
औरंगाबाद शहराला सहा दिवसातुन एकदा पाणी येते त्यातच नळाला जर दुषित आणि दुर्गंधी युक्त ड्रेनेजचे पाणी येत असेल तर स्थानिकांचा वर्षभराचा पाण्याचा कर मनपा प्रशासनाने माफ करावा अशी मागणी नागरीकातर्फे होत आहे. संपूर्ण देशात कोरानाचा कहर आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या जिवाची विशेष काळजी घेत असतांना अशा ड्रेनेजच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही. काही महिन्यापूर्वी याच वार्डातील संभाजी काॅलनी ई सेक्टर, जी सेक्टर मधील नागरिकांना दुषित आणि दुर्गंधी युक्त ड्रेनेजचे पाणी येत असल्याचे चित्र ताजेच असताना परत असाच प्रकार पुन्हा याच भागात घडतो हे निदंनीय आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला पाहीजे. हा वार्ड मोठा असल्याने याभागात अनेक समस्या आहेत. मनपा प्रशासन औरंगाबादच्या नागरिकांकडुन पूर्ण वर्षभराचा कर आकारते मात्र स्वच्छ पाणी देण्यास निष्फळ ठरते. दुषित आणि दुर्गंधी युक्त पाण्यामुळे लहान मुले. महीला तसेच वृद्ध व नागरीक सतत आजारी पडत आहेत. परिणामी आजारापासुन वाचण्यासाठी विकतचे फिल्टर केलेले जारचे पाणी घ्यावे लागते त्यामुळे आर्थिक भुर्दड सुद्धा लागतो. काही लोकांना गरीब परिस्थितीमुळे फिल्टर केलेले जारचे पाणी घेणे शक्य नाही. या भागातील ड्रेनेजलाईन वारंवार चोकअप होते त्यामुळे जलवाहीनीच्या आत ड्रेनेजचे पाणी शिरते. ड्रेनेजलाईनचे काम लवकर करावे आणि पाण्याची समस्या पण मनपा प्रशासनाने तात्काळ सोडवावी अन्यथा स्थानीक नागरिकांना घेऊन मी मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतोय. 



सिडको एन सहा मथुरानगर, संभाजी काॅलनी जी सेक्टर, ई सेक्टर भागातील नागरीकांना गेल्या 4 वर्षापासून काळया पाण्याची शिक्षा.. सिडको एन सहा मथुरानगर, संभाजी काॅलनी जी सेक्टर, ई सेक्टर भागातील नागरीकांना गेल्या 4 वर्षापासून काळया पाण्याची शिक्षा.. Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.