टॉप बातम्या

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे करण्यात आले वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१३) : पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी कसल्याही प्रकारचे बॅनर फ्लेक्स न लावता कृषी उत्पन्न बाजार समिती व नांदेपेरा मार्गावर वृक्षारोपण करून निसर्ग वाढीला चालना देण्याचा उपक्रम हाती घेतला. आदित्य ठाकरे यांनी कोरोना संभाव्य काळ लक्षात घेता, त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरातींवर व होर्डिंग्ज लावण्यावर अकारण खर्च न करता जनहितकारक उपक्रम राबविण्याचे आव्हान केल्याने अजिंक्य शेंडे यांनी झाडे लावून पर्यावरणाची होणारी हानी भरून काढण्याचा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम राबविल्याचे गौरव उद्द्गार शिवसेनेचे सुनिल कातकडे यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद मिलमिले, सतीश बडघरे, नगर सेवा समितीचे नामदेव शेलवडे, राजेंद्र साखरकर उपस्थित होते. 
वृक्षारोपण करतेवेळी हेमंत गौरकर, सौरभ वानखेडे, ध्रुव येरणे, योगेश आवारी, शिवराम चिडे, किशोर ठाकरे, अमृत फुलझले, नरेश ठाकरे, नैनीश हनुमंते, मंगेश डांगे, प्रणय मिलमिले, अभय सुरशे आदी युवा शिवसैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post