पुन्हा! वनोजा देवी परिसरात अवैध मद्य वारे वाहू लागले - रोशन शिंदे

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (ता.१३) : मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी परिसरात पुन्हा अवैध दारू विक्री सुरु झाली ही दारू कोणाच्या कृपा आशीर्वादाने होत आहे असा सवाल महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे रोशन शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या देवी परिसरातील अवैध दारू बंद होती. मात्र, लॉकडाऊन निर्बंध शिथिल होताच पुन्हा याठिकाणी अवैध देशी दारू विकली जात आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. परिसरात सध्या शेतीच्या कामकाजाला सुरुवात झाली असून कसेबसे शेतमजूरांच्या हातात पैसे येत असल्याचे पाहून अवैध दारू तस्करांनी आपले दुकान थाटले असल्याचे ते म्हणतात.
 जरी कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसरी लाट ची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने देवी सारख्या धार्मिक स्थळ परिसरात होत असलेली दारू विक्रीकडे लक्ष घालावे  असे, मनसेचे रोशन शिंदे यांनी 'सह्याद्री ई न्यूज'  सांगितले आहे.
पुन्हा! वनोजा देवी परिसरात अवैध मद्य वारे वाहू लागले - रोशन शिंदे पुन्हा! वनोजा देवी परिसरात अवैध मद्य वारे वाहू लागले - रोशन शिंदे Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.