जात प्रमाणपत्र रद्द करुन 'नवनीत राणा' यांना 2 लाखाचा ठोटावला दंड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (ता.८) : खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत मा.खासदार श्री.आनंदरावजी अडसुळसाहेब यांनी मा.उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल आज दिनांक ०८.०६.२०२१ रोजी घोषीत करण्यात आला.

मा.उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे असे, मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना रु.२.०० लाखाचा दंड ठोटावला आहे. तसेच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र ६ आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

मा.आनंदरावजी अडसुळसाहेब यांच्या वतीने अॅड.सी.एम्.कोरडे, अँड.प्रमोद पाटील व अॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली. त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकी अडचणीत आली असल्याचे या निकालानंतर दिसून येते आहे.
जात प्रमाणपत्र रद्द करुन 'नवनीत राणा' यांना 2 लाखाचा ठोटावला दंड जात प्रमाणपत्र रद्द करुन 'नवनीत राणा' यांना 2 लाखाचा ठोटावला दंड Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.