आज सोमवारी चंद्रपूरात पाणीपुरवठा बंद

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
चंद्रपूर, (ता. ३०) : महानगर पालिकेच्या हद्दीत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपीएसच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यामुळे सोमवारी (३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

सिटीपीएसच्या कामामुळे पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्याने रविवारी (ता. ३०) इरई धरणावरुन पाणीपुरवठा शहराच्या काही भागात होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे.

त्यामुळे सोमवारी (ता. ३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

आज सोमवारी चंद्रपूरात पाणीपुरवठा बंद आज सोमवारी चंद्रपूरात पाणीपुरवठा बंद Reviewed by सह्याद्री चौफेर on May 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.