टॉप बातम्या

मनसेच्या माध्यमातून मिळाला शेतकऱ्यांना हक्काचा पांदण रस्ता

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (ता.३१) : वणी तालुक्यातील लाठी येथील अनेक शेतकऱ्यांच्या वहीवाटीचा असलेला पांदण रस्त्याची दुरवस्था झाल्याने, हा पांदण रस्ता पावसाळ्याच्या आगोदर दुरुस्त करून द्यावा. या मागणीला घेऊन सदर संबंधित शेतकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, ह्या शेतकऱ्यांच्या मागणीला वेकोलि प्रशासनाने वारंवार धुडकावून लावले.

त्याअखेरीस ह्या शेतकऱ्याने राजूभाऊ उंबरकर यांच्याकडे संपर्क साधताच आज प्रश्नावर तोडगा काढत वेकोलि च्या संबंधित अधिकाऱ्यांशी राजूभाऊंनी संपर्क साधुन ह्या रस्त्याचे संपूर्ण काम करून घेतले.
पांदण रस्त्याच्या काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे हसू उमटून आले.


Previous Post Next Post