सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (ता. ३०) : 'शिवसेना म्हणजे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण' जनहितासाठी सतत लढणारी आणि पाठीशी उभी राहणारी एकमेव संघटना. सेवा, सुरक्षा, विकास या धोरणावर चालणाऱ्या शिवसेना पक्षातील जिल्हा प्रमुख तथा मा. माजी आमदार श्री. विश्वास भाऊ नांदेकर यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी यांच्यासह शिवसैनिकांनी खैरगांव (बुट्टी) येथील नागरिकांना हॅन्ड सॅनिटायजर वाटप करण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना संसर्ग विचारात घेवून जिल्हा प्रमुखांच्या सूचनेवरून तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी यांनी उपाय योजना म्हणून ही लाट थोपवण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला. ही कोविड दुसरी लाट करतोय आपण मात्र,संभाव्य तिसरी लाट एकजुटीने सामना करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिवसैनिकांनी खैरगाव येथे हॅन्ड सॅनिटायजर केले वितरण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 30, 2021
Rating:
