सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (ता.३१) : शेतकरी संघटनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील आणी मराठवाड्यातील मुलुख मैदानी तोफ म्हणून लोकप्रिय असलेले प्रभाकराव दिवे. संपूर्ण विदर्भात विदर्भवादी नेता स्वतंत्र भारत पक्ष स्वतः शेतकरी संघटनेचा कट्टर समर्थक माजी आमदार ॲड. वामनराव चटप. त्यांचा उजवा हात असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दोनदा मानद सचिव, दोनदा सदस्य राजुरा निर्वाचन क्षेत्रातून विधानसभे करिता ॲड. वामनराव चटप यांच्या च्या समर्थनार्थ स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना समर्थित उमेदवार म्हणून उभा असलेला तत्कालीन स्वतंत्र भारत पक्ष तथा शेतकरी संघटनेचा जिल्हाप्रमुख प्रभाकर राव दिवे मागील १८ दिवस दिनांक १४ मे रोजी त्यांच्या कारचा अपघातात झाला होता. दिवे स्वत :चलवत होते. सदर १८ दिवस सुरू असलेली झुंज अखेर आज संपली.
सविस्तर असे की, आवारपूर येथून राजुरा येथे जात असताना अंबुजा सिमेंट कारखान्याजवळ त्यांच्या वाहनाची ट्रकला धडक बसल्याने त्यांच्या पायाला व मानेला गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारार्थ त्यांना चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले प्रकृती बघता चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नागपूर येथे उपचारार्थ पाठविले यातच च्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे शेवटी आज त्यांची झुंजीत गतप्राण झाले. त्यामुळे राजुरा निर्वाचन क्षेत्र व संपूर्ण परिसरात दुखाचे सावट पसरले असून त्यांचे वरती आवारपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मुख्याध्यापिका शिवाजी विद्यालय अंतरगाव मुलगा सून भावंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
प्रभाकर दिवे त्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेचा परिवार दुःखाने व्याकूळ झाला असून दिव्यांची निधनाने ही झालेली पोकळी नेहमी आठवणीत
राहील. त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे भावपूर्ण आदरांजली..
.
शेतकरी संघटनेचा उत्कृष्ट कार्यकर्ता गमावला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 31, 2021
Rating:
